by khalnayk
पाचवी पर्यंत प्रेम म्हणजे काय असतं ते माहीतच नव्हतं…
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
दहावी पर्यंत अभ्यास,अभ्यास आणि अभ्यास…
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
आता थोड तरी कळायला लागलं होत की प्रेम म्हणजे काय असतं,पण बारावी म्हणजे
आयुष्याच वळण…
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
शाळेत असताना मुलीशी जास्त मैत्री कधी साधलीच नाही
त्यामुळे कॉलेज मध्ये सुध्दा मैत्री जपताच आली नाही…
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
आता मैत्रीनीही खुप आहेत, पण प्रपोज करायला डेअरींगच होत नाही…
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.